Saturday, June 24, 2017

कोई अँब्युलन्स बुलाव यार..!!


शुक्रवार असून आज ऑफिसमध्ये काम खूप होतं. काम करता करता खावं म्हणून लंच बॉक्स उघडला. स्क्रिनकडे बघत-बघत एकीकडे खात होतो.

हम्म.. चिकन नूडल्स मस्त बनवलेत समोरच्या चायनीज काकूंनी. दोन-तीन घास छान खाऊन झाले. तिसरा घास काहीतरी वेगळाच लागला. ठीक आहे यार. मीठ कमी आहे वाटतं. ह्या लोकांना अळणी आणि बेचव करायची सवय असतेच.

पण येवढा वेळ का लागतोय चावायला? थोडा चिली सॉस घालून खावं. अरेच्चा दुसरा घास पण असाच..!! एकदम बेचव आणि च्युईंग-च्युईंग...!! अरे काय आहे काय हे...!!?
आयच्या गावात... कोई अँब्युलन्स बुलाव यार..!!
 
PJ


No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...