उदय जोशी आमचे (आईकडून, बाबांकडून असतं तसे) फेसबुककडून काका. ह्या राजाआदमीची माझी पहिली भेट झाली मुंबई एयरपोर्टवर. मला घ्यायला ते सकाळी आलेले. खादीचा झब्बा, जीन्स आणि...
अरे एsss... आहेत ते अजून... त्यांच्या कार्यक्रमाचं भाषण काय करायलात मेल्यानो. खादीचा झब्बा म्हणे...!!
पण उदय गुर्जी पोरांचा दोष नाही, दोष (समेवर येऊन) तुमचा आहे. इकडे फेसबुकवर आणि तिकडे कट्ट्यावर जाता-येता लोकांच्या टोप्या उडवणार्या बेरकी आणि दिलखुलास कोकणास्थाच्या तोंडी असली आभार प्रदर्शनाची मिळमिळीत भाषा आजीबात शोभत नाही.
साने गुर्जीनंतर येवढ्या प्रेमाने आभार प्रदर्शन करून तुम्ही साने गुर्जींच्या शेजारच्या फ्रेममध्ये सात-बारा लावत आहात असा आमचा संशय आहे. पण अश्या कित्येक 'सखारामांच्या' टाक्या तुम्ही बोळे काढून मोकळ्या केलेल्या आम्ही ह्या डोळ्यांनी पहिल्या आहेत. तेव्हां राहुंद्या.
हां तर उदय भगवान... तुमच्याच असं नाही आम्ही फेसबुकवरच्या जवळ-जवळ सगळ्याच पोष्टी वाचतो. तुमच्या तर वाचतोच वाचतो. तुम्हीच उल्लेख केलेल्या पोष्टी तर लैच कहर होत्या. लोकांनी उचलून धरणं साहजिक आहे. त्या विनाक्रेडिट व्हाट्सअँप वर फिरण्याचीही आता सवय करून घ्या.
तुम्ही पुंगी वाजवत आहात तोवर आमच्यासारखे उंदीर तुमच्यामागे येत राहतील. फिरून पुन्हा आभार देत बसू नका. उंदरं भांबावतात. त्यापेक्षा कट्ट्यावर जा... रिचार्ज व्हा... आणि येउंद्या अजून एक फक्कड पोष्ट...!!
वाट बघतोय...
एक उंदीर.

No comments:
Post a Comment