Monday, May 22, 2017

भुणभुण.....

तुझा मूड गेलाय... माझ्यामुळं का?
तू आज जेवला नाहीस नीट... माझ्यामुळं का?
तू आज हा शर्ट घातलास... माझ्यामुळं का?
आज तू ऑफिसमधून उशीरा आलास.. माझ्यामुळं का?
आज पेट्रोल महाग होतं... माझ्यामुळं का?
सेन्सक्स आज सहाशे पॉइंट्सने पडला... माझ्यामुळं का?
भारताने न्यूक्लियर अग्रीमेंट साईन केले... माझ्यामुळं का?
रशियाने सिरियावर हवाई हल्ले केले... माझ्यामुळं का?
ही पृथ्वी सूर्यभोवती फिरतेय... माझ्यामुळं का?
माझ्यामुळं का...? माझ्यामुळं का...!?
.
.
.
.
.
.
.
.
अगं जगतजननी... हो... हो... हो...!!
हे सगळं तुझ्यामुळंच होतंय... झालं समाधान...!?
बास... चालले मी माहेरी...!!!

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...