आमच्या ऑफिसमधला गोरा सेल्स मैनेजर... चाळीशीचा ठोंब्या... पंधराव्या वर्षी घरातून बाहेर पडून अगदी ट्रक ड्रायव्हर पासून सगळी काम केलेला. शर्टमधुन दिसेल तेवढ़या ठिकाणी टैटू काढून रंगकाम केलेल. एवढंच काय फेसबुकवर मैत्रिणीबरोबर हयाचे फ़ोटो... हा उघडा बंब तर ह्याची मैत्रीण संपुर्ण उघडी पाठ दाखवून तिच्या अंगावरचे टैटू दाखवतेय...!!
ह्यांचा नेहमीचा आवडता टैटू म्हणजे गौतम बुद्ध... अंगावर कुठे भलत्या जागी बसवतील बुद्धाला काही भरोसा नाही. पुढे जाऊन हे दिवस बघावे लागणार आहेत हे जर बुद्धाला आधीच कळलं असतं तर ध्यानधारणा न करता त्याच बोधी वृक्षाखाली त्या बिचार्याने 'कषाय पेयाचा रथ' सुरु केला असता...!!
ही ह्याची दूसरी की तिसरी गर्लफ्रेंड. आता ह्यांच्या मैत्रिणी आपल्याकडच्या सारख्या फ़क्त कॅनटिंनला गप्पा मारण्यापुरत्या नसतात. डायरेक्ट एकत्र राहायला लागतात. पहिली गर्लफ्रेंड वयाच्या पंधराव्या वर्षी... काही महिन्यातच तिने गुड़ न्यूज दिली. सतराव्या वर्षी हा बाप झाला. ह्याच गतीने जॉब आणि गर्लफ्रेंड्स बदलत इथपर्यंत आलेला.
हया टैटूवालीच्या हौसेखातर थायलंडला जाऊंन मोठ्या दिमाखात लग्न करून आला. फेसबुकला फोटो... स्टेट्स अपडेटेड टू Married ... म्हणलं आतातरी पोरगा सेटल झाला. (meanwhile ह्याचा पोरगा वीस वर्षाचा होऊन गर्लफ्रेंडसोबत रहायला गेला.) काही दिवस गेले. आमच्याकडे एक फटाकड़ी रिसेप्शनिस्ट जॉइन झाली. तिथे हे महाराज हजर. लोकांच्या लक्षात येईल इतकं फ्लर्टिंग सुरु...!!
म्हणलं काय रे? लग्न झालंय ना आता? मला म्हणतोय... नो इट डिडन्ट वर्क...!! झालं. तरीच गायब होता फेबुवरुन. आता पुन्हा पुढची गर्लफ्रेंड सापडलिये. पुन्हा फर्स्ट डेट... पुन्हा पहिलं कॅण्डल लाईट डिनर... प्रपोज करणं... उरी धडधडणं... नवे कपडे... नवे टैटू...!! चाळीशी आली तरी अजून यौवनात मी...!! थोड्याफार फरकाने सगळे गोरे एकाच माळेचे मणी.
ही आपली सहज गंमत सईला सांगत होतो. म्हणलं 'हां सततचा बदल त्यांना कसा तरुण ठेवतो ना. च्यायला आपल्यासारखं नाही...!!' ती किचनमध्ये मुग निवडत असावी... दुसर्याच क्षणाला हवेत उडालेले मुग... माझ्या दिशेला भिरभिरत येणारी चाळणी आणि त्यातून दिसणारा तिचा भड़कलेला मुखचंद्रमा...!!
हॅप्पी करवा चौथ...!!
प्रणव

No comments:
Post a Comment