मॉलमध्ये हिंडत होतो. आता न लागणार्या हजारो गोष्टी उगाचच खरेदी करणार्या भंपक गिर्हाईकाचा कित्ता आम्ही अगदी प्रामाणिकपणे निभावत असतो. हाफ प्राईसमध्ये डिजीटल वेट स्केल दिसलं. आता कशाला हात दाखवून अवलक्षण... पण घेतलं उगाच...!!
आणल्या-आणल्या त्याच्यावर उभं राहून वजन करून झालं. मग बूट काढून... जॅकेट काढून... जीन्स काढून... करत-करत 'बाथरूम स्केल' बाथरूममध्ये नेऊन अगदी बंबू... असो... फक्त बॉडी वेट अगदी शेवटच्या ग्रॅमपर्यंत शोधून काढलं. त्यात आमच्या मॅडमनी आमचं दोघांचंही वेट हाईटच्या रेशोमध्ये पाच-सहा किलोनी जास्त आहे हा निकाल दिला.
'तुझं पोट दिसायला लागलंय हं प्रणव...!!' ऍहॅ इतके दिवस दिसलं नव्हतं. आता बीएमआय कळला कि दिसायला लागलं होय...!!?
मी लगेच श्वास ओढून घेत... 'काही नाही हा... हा शर्ट जरा लुझ आहे. मी काही एवढा जाड नाही. आणि माझ्यापेक्षा बारीक होण्याची गरज तुलाच आहे...!!' झालं... त्या जयकांत शिखरेचा इगो काय हर्ट झाला असेल त्याच्या डबल हिचा... आली रे आली... आता तुझी बारी आली... असे एक्सप्रेशन्स देऊन ही उठून गेली...!!
तेंव्हापासून ही एकदम ग्रीन टी... एकदाच जेवण... फलाहार... रोज दीड-दोन तास वॉक आणि काय-काय करायला लागली. मी पण चॅलेंज घेतलं. म्हणलं बघच कसं वजन कमी करून दाखवतो. तुझ्यापेक्षा जास्त वेट लॉस नक्की...!!
दुसर्याच दिवशी ब्रेकफास्टला बॉइल्ड एग सँडविच. लंचला पालक पनीर... घरी आलो तर रात्री झणझणीत अंडाकरी...!! म्हणलं जाऊ दे पहिलाच दिवस आहे डायटचा. दुसर्या दिवशी मित्राकडे बार्बेक्यू पार्टी... अपेयपान आणि अभक्ष-भक्षण. तिसर्या दिवशी ऑफिसमध्ये पार्टी... पिझा आणि कोक. हे घरी ऋचाला चुकून सांगितलं तर डिनरला पुन्हा चीझ पिझा...!! त्याच्या दुसर्या दिवशीपासून सईची दिवाळी तयारी आणि माझ्या डायटची दिवाळं तयारी सुरु...!!
हल्ली रोज वेगवेगळे कमीतकमी तीन लाडू, जेवताना बाकरवडी-शेव, दुपारच्या चहाबरोबर शंकरपाळी, रात्री दहीभाताबरोबर चकली नाहीतर चिवडा... नॉर्मल जेवण तसंच आणि उन्हाळा सुरु झालाय म्हणून झोपायच्या आधी आईस्क्रीम...!! वाढता देहभार विसरून मी ह्यावर तुटून पडतो.
हिचं हे कुटील कारस्थान मला कळतं हो... पण तोवर फार उशीर झालेला असतो. आकंठ जेवण झाल्यावर अतिशय करुण नजरेने मी त्या डिजिटल स्केलकडे बघत असतो आणि मग लक्षात येतं... इथे तिने एकदम 'चतुर' स्ट्रॅटेजी घेतली आहे...
'अगर तुमको पतला दिखना है तो सामनेवाले को मोटा करो...!!'
प्रणव.

हा हा मस्त...😊
ReplyDeleteहा हा मस्त...😊
ReplyDelete