आम्ही पण मसाला पान खाणारेच... भोपळा बांधुन पोहणार्या बावळटांपैकी...!! आम्हाला अगदी सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही हो... हे म्हणवून घेण्यातच धन्यता मानणारे...!!
असंच तिरमिरीत एकदा मित्रांबरोबर फुलचंद पान खाल्लं... आणि उकिरडा बघून पचाक्कन पिंक टाकली. तोवर मला पान खाऊन थुंकता येतं हे माझं मलाच माहित नव्हतं. मला जो काय आनंद झाला सांगतो महाराजा. मित्राला excitement मध्ये हे सांगितलं तर साँस-बहुच्या सीरियल मधल्या कजाग सासुसारखा थंड चेहरा ठेऊन उपरोधाने मला म्हणतोय... "मग आता संगमरवरी फरशी लावायची का इथे...!? 'प्रणवराजे पान खाऊन इथे थुकले म्हणून...!?'"
श्या: लोकांना दुसर्याची प्रगती बघवत नाही हेच खरं...!!
नाय का ओ...!?
प्रणव

No comments:
Post a Comment