Friday, November 13, 2015

सीता और गीता

ब्राम्ह मुहूर्तावर रंगोली बघुन-बघुन... 'जिंदगी है खेल कोई पास कोई फेल...!!' किंवा... 'हवा के साथ-साथ... साथी चल...!!' सारखी गाणी तोड़पाठ केलेली आज कित्येक वर्षांनंतर बघतोय...!!

खरी मजा वाटतेय ऋचा हा सिनेमा एंजॉय करताना बघुन... मनोरमा चाचीला गीता कडून मार खाताना बघुन...!! गीताची दादागिरी बघून जोरजोरात खिदळतिये...!!!

ह्यात करोडों के जायदाद की मालकीन एका डोंबार्याशी लग्न करते कारण तो हमेशा हमेशा के लिये दारू छोड देतो म्हणून... आणि लंडनहून डॉक्टर बनून आलेला... गोल्फ खेळत असलेला रवि डोंबारणीशी लग्न करतो कारण तिला 'केट्स' छान जमतायत म्हणून...!? काहीही हां सिप्पी...!!

एवढंच नाही तर व्हीलनसुद्धा काय 'उसूल और आदर्श' मानणारा... हिरोईनला धमकी देतोय..."ये शादी का जोडा पेहेन के चुपचाप नीचे आ जाव". शिवाय अग्नि के सात फेरे आणि पंडित पण घेऊन आलाय मंत्र म्हणायला...!! बिचारा रीतसर तिच्याशी लग्न करतोय... म्हणजे त्या नंतर तिने सांगितलेली भाजी, दुध, गॅस, पोरांच्या शाळा आणि रेशनकार्डाच्या रांगा त्याला मान्य आहेत तर...!! किती साधा जमाना होता हो...!!

सहकुटुंब सहपरिवार बसून... कुठला भलता शॉट / डायलोग येईल अशी धाकधूक मनात न ठेवता बघता येणारे सिनेमे का बनत नाहीत आता?

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...