दहा-अकरा महिन्यांपुर्वीच घेतलेला Samsung Galaxy S3 battery च्या क्षयरोगाने अकालीच शेवटच्या घटका मोजतोय. दिवसातून तीन वेळा सलाईन देण्यापासून सतत व्हेंटीलेटर असण्या पर्यन्त परिस्थिती खालावत गेलीये. मोबाईलची landline झालीये अगदी... भ्रमण्ध्वनीच्या वैद्यांनी विजेरीला सूज आल्याचं निदान केलंय . ह्यावर विजेरी प्रत्यारोपण हा एकच उपाय आहे.
किडनीदाता मिळणं जेवढं अवघड तेवढंच Samsung ची सुट्टी battery मिळणंही कष्टप्रद आहे हा मला आलेला अनुभव. 'मोबाईलच नवा घ्या साहेब कुठे battery वर पैसे खर्च करता...!' हा सल्ला. चायनीज मेड असला तरी एका वर्षात महागडा दुसरा फोन घेणं जरा जीवावर येतंय.
सगळ्या परिस्थितीला वैतागून अडगळीच्या खोलीत गेलो आणि पुरातन वस्तुसंग्रहालयातुन उत्खनन करून 'नोकिया E5 ' नामक माझा जुना साथीदार शोधून बाहेर काढला. हा फोन शद्बश: लोखंडाचा आहे. मेटल बॉडी असलेला. चार्जर कुठे ठेवला होता हे विसरून जाईपर्यंत battery चालते ह्याची.
पण दुर्दैव काय सांगता महाराजा. संकटं आली की अशी चारी बाजूने येतात. नोकियाचा सिमकार्ड स्लॉट Samsung च्या दुप्पट मोठा आहे. आणि नवीन स्लिम -ट्रीम सिमकार्ड ह्या ठोकळ्यामध्ये बसत नाही. म्हणजे तुमच्याकडे असावं पोलादी भक्कम कुलूप आणि दाराला कडीच नाही फक्त latch असावं तशी परिस्थिती.
इलेक्ट्रोनिक टेक्नोलोजी ही हिंदी सिनेमातल्या 'कबख्त हालात और निर्दयी समाज' मुळे गुन्हेगारीकडे वळलेल्या हिरोप्रमाणे असते. 'मै अब बहोत आगे निकल चुका हुं . जिस मकां पर मै अभी खडा हुं वहा से लौटने के सारे रास्ते बंद हो जाते हाऊ...!!'
ढ्यांग्ग्ग...!!!
प्रणव.

No comments:
Post a Comment