दुपारी मस्त झोप काढून उठलं की आमच्या ऋचाचं biological क्लॉक पुन्हा झीरोला सेट झालेलं असतं. तिला वाटतं की नवीनच दिवस सुरु झालाय. मग सकाळी काय केलेलं आहे ते ती 'काल केलं होतं' अश्या संदर्भाने बोलत असते. दुपारी दुध पीत असताना विचारते... आत्ता नक्की काय आहे? Morning, afternoon की evening...!?
अश्याच एका दुपारी शेजारी बसून मला म्हणत होती... 'बाबा ती poem आहे ना...
'Row, row, row your boat,
Gently down the stream.
Merrily, merrily, merrily, merrily,
Life is but a dream...'
तसं मला कळतच नाही की मी नक्की dream बघतेय की खरच दिवस सुरु आहे. स्कूल, माझे फ्रेण्ड्स, आपण जातो ती पार्क्स आणि आपण बीचवर केलेला sand castle सगळं मला dream मध्येसुद्धा दिसतं. आणि आत्ता मी बसलेय तर वाटतं की अजून हे ड्रीमच सुरु आहे.'
माझ्या मनीमाऊचं dream मी अगदी कौतुकाने ऐकत होतो. पुढे म्हणाली, 'मग मी काय करते माहितीये... स्वत:च्या हाताला जोर्रात पिंच करते... दुखलं की मला समजतं हे रियल आहे... ड्रीम नाही...!!'
निरागसपणे माझी चिमणी हे बोलून खेळायला समोरच्या अंगणात भुर्रकन उडुन गेली... आणि मी तिच्या दुधाच्या कपात तळाशी राह्यलेल्या साखरेकडे बघत राहिलो... तळापासून ढवळून निघालेला...!!
प्रणव.

No comments:
Post a Comment