Tuesday, June 2, 2015

रुट कॅनेलचे डोहाळे

माझ्या मित्राच्या बायकोला चार दाढांचे रुट कॅनेल करण्याचे सहा हजार डॉलर्स सांगितले. त्याने सरळ बायको आणि दोन मुलांचे भारताचे तिकीट काढुन दिलं.

ती तिकडे अपोलो हॉस्पिटलमध्ये पन्नास हजार खर्च करून ट्रीट्मेण्ट घेऊन आली. बरं ह्या फाईव्ह स्टार हॉस्पिटलात खाण्यापिण्याची चैन... ब्रेकफास्ट फुकाट... फ्रुट प्लाटर फुकाट... त्यामुळे भेटायला येणार्या नातेवाईकांची रांग. आता दाताचा पेशंट असे किती फ्रुट्स खाणार?

च्यायला संत्री घेऊन जावी लागतात म्हणुन लोकं हार्ट पेशंटला भेटायला जात नाहीत... इथे दाताडाच्या पेशंटची काळजी.

एकदा दीड कोटींचा Australian health insurance आहे म्हणल्यावर तुम्ही हॉस्पिटलचे जावई होता... एकदम रेड कार्पेट सर्विस...!! त्यामुळे सगळे डोहाळे डॉक्टरच पुरवत होते. वर आणि ती माहेरी दोन महिने राहून आली.
पैसे मिळाले म्हणून डॉक्टर खुश... माहेरपण मिळालं म्हणून बायको खुश... आणि इथे पार्ट्या करायला निवांत वेळ मिळाला म्हणून आमचा ठोंब्या पण खुश...!!

येवढं सगळं करून विमानाच्या तिकीटासकट सगळं almost निम्म्या खर्चात भागलं ते वेगळचं...!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...