Tuesday, June 2, 2015

नमस्ते लंडन

नवीन हिंदी पिक्चरबद्दलच माझं ज्ञान हे थेट राहूल गांधीच्या राजकारणाच्या एकूण क्षमतेशीच compare करता येईल. कुठला पिक्चर पाहिला नाहीये ह्यापेक्षा कुठला पाहिला आहे ही यादी लवकर होईल.
चारचौघात बोलताना पितळ उघड पडणार नाही इतपत स्मार्टनेस ठेऊन बर्याच ठिकाणी वेळ मारून न्यावी लागते. अगदी फेमस पिक्चरबद्दल विषय चालला असला तरी माझ्या चेहर्यावर 'मनमोहनसिंग' आणि 'मोनालिसा' यांच्या मिश्रणातून आलेले एक्स्प्रेशन्स असतात.

अश्याच न पाहिलेल्या पिक्चरच्या यादीतला 'नमस्ते लंडन' आज संध्याकाळी पाहिला. (हो माहितीये... खूप जुना आहे. आत्ता पाहिला. काय करता मग आता...!?) हिमेश रेशमियाची संडासमध्ये बसूनसुद्धा गाण्याची लायकी नसलेली गाणी आणि स्टोरिची impracticable वाटचाल वगळता बराच एन्जोय केला मी हा पिक्चर.
डोक्याला विश्रांती हवी हो मधून-अधून... सारखंच काय...!?

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...