Tuesday, June 2, 2015

झोप घे रे...!!

येवढंच कशाला... काल रात्री केराओके लावून... माईक घेऊन चक्क मी स्वत: गाणं म्हणलं... 'आकाशी झेप घे रे पाखरा...' बरं ऐकायला फक्त ऋचा आणि सई होत्या.

आज सकाळी ऑफिसला जायला निघालो तर ऋचा कारपाशी आली आणि मला बिलगून म्हणाली... 'बाबा खूप काम असतं का रे ऑफिसला...!? आज जरा लवकर ये ना घरी...रेस्ट घे...!!'

आणि ती असं का म्हणाली हा विचार करत ऑफिसला पोचलो. श्या: गाण्यापुर्वीच विचार करायला हवा होता.

मला वाटतं आधी आनंद शिंदे, शब्बीर कुमार, कुमार शानुपासून सुरुवात करायला पाहिजे होती.
डायरेक्ट बाबुजींचं गाणं घेतल्याने घोटाळा झाला.

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...