Tuesday, June 2, 2015

माझ्या क्रशसीमा

मी कॉलेजला असताना श्रेया घोषाल ने गायलेली 'तिन्ही सांजा' ह्या अल्बमची गाणी ऐकून मी वेडा झालो होतो. माझ्या दोन-अडीचशे क्रशपैकी ती एक होती. 

माझ्या एक बंगाली मित्राबरोबर माझा जोरात वाद झाला होता जेव्हा त्याने सांगितलं की 'श्रेया' मराठी नाही बंगाली आहे. मी आपलं 'पिसाळ', 'मासाळ' तसं 'घोसाळ' म्हणून चाललो होतो. 

ती मराठी मुलगी नाही हे ऐकून मला अपार दु:ख झालं होतं. त्या वेळच्या माझ्या क्रशसीमा भाषेपुरत्या मर्यादित होत्या हे दुर्दैव म्हणायचं. पुढे मी ती चूक सुधारली... आता 'अवघे विश्वची माझे घर' पर्यंत मजल जाऊन पोचली आहे म्हणा ना...!! 

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...