नव्वद फ्रेन्ड्स, पंधरा ग्रुप्स आणि दिवसातले कमीतकमी चार तास whatsapp हे रुटीन झालं होतं माझं... घरात बायको आणि हाफिसात साहेब दोघही उखडून असायचे. रात्रीतुन दोनदा उठुन मेसेजेस वाचत असे मी... हो मग सकाळी एकदम पाच-सहाशे मेसेजेस कसे वाचणार ना...!! ब्राम्हमुहुर्तावर चिंतन आसनावर बसुन दोनेकशे मेसेजेस वाचणं सोपं आहे. वस्तुत: पहिल्या पन्नास मेसेजेसमध्येच मुळ काम उरकत असल्याने वेळ काढणार तरी किती...!?
साहेबाचा त्रागा आणि बायकोची कटकट बंद करण्यासाठी एक दिवस वैतागलो आणि whatsapp काढून टाकलं. आधी त्याच्याशिवाय जगेन की नाही असं वाटत होतं. पण ’अजुन जीव आहे...’...!! जे खरोखर मित्र-मैत्रिणी आहेत आणि मला मिस करत होते त्यांनी फोन करुन वा फेबुवर मेसेज करुन मी जिवंत असल्याची खातरजमा करुन घेतली. (ह्यात देणेकर्याचा एकही फोन नव्हता बरं...!!) whatsapp बंद केल्यापासुन डोकंही जरा शांत वाटतयं. थोडा माझा मला वेळ मिळतोय. ह्यावर बायको काही खुष नाही पण. अजुन मी फेबुवर वेळ घालवतोच आहे असा धोसरा लावला आहे तिने. च्यामारी... स्त्री ही हनिमुन ओसरेपर्यंतची बायको आणि अनंत काळची माता असते म्हणतात ते काही खोटं नाही.
माझ्या सगळ्या वाईट सवयी हाणून पाडायचा चंगच बांधलाय जणू हिने. सुधारणार म्हणे मला... अरे हम सुधारनेवाली चीज क्या... पनीर... चक्का... लस्सी... दही... कुछभी नही है... जे खर्या मातेला तीस वर्षांत जमलं नाही ते ही दहा वर्षात काय करणार...!? हा थोडं तिला काम जास्त पडतं मान्य आहे. घरातलं काम, ऋचाचा अभ्यास, शाळेत सोडणं-आणणं, भाजी-सामान आणणं हे सगळं तिलाच करावं लागतं म्हणे... ठीक आहे ना... तिला प्रोमिस केलंय की पुढच्या रविवारपासुन कामं करीन मी पण म्हणुन... फेबु तर कालपासुनच बंद करणार असं वदवुन घेतलं होतं माझ्याकडुन...! पण मी कसला कोडगा आहे काय माहित तिला... नेताच होणार होतो... चुकुन इंजिनीयर झालो... आईबाबांनी वेळीच अभ्यास पाडला नाही म्हणुन...!!

पुन्हा फेबुवर दिसलो तर डोकं धरुन की-बोर्डावर धुणं धुवीन अशी धमकी देऊन भाजी आणायला गेलीय... ती येईपर्यंत मी ग्क्ग्फ़्क्ज क्ल्झ्ग्ल्क ल्कुह्ल्ख ज्त्फ़्श्फ़्ख ज्दिउह्ल्प ग्फ़्स्झ्ग्म झ्ग्फ़्द्य्द...
आली झ्फ़्स्ध्त्यो ती म्न्व्ब्च्ज्क्न मी त्ग्फ़्दिओह्क जातो ह्ग्फ़ेउयितो
प्र ज्फ़्ह्गिफ़्ध ण य्द्फ़्झ्ग्क व ज्य्द्त्फ़िह्ग
No comments:
Post a Comment