Saturday, March 7, 2015

सिक्रेट टिप्स

पल्याकडे अभ्यास किंवा आर्टला जेवढं महत्व दिलं जातं तेवढं इथं स्पोर्ट्सला दिलं जातं. मुलांना वेगवेगळ्या स्पोर्ट्स activities साठी भरपूर सुविधासुद्धा आहेत. शाळांमधुन, निरनिराळ्या स्पोर्ट्स क्लब्समधून सगळी मुलं कुठे ना कुठे खेळात active असतात.

'When you are in Rome...' ह्या न्यायाने आम्हीही ऋचाला एका athletics क्लबमध्ये भरती केलं. दर शनिवारी स्पर्धा असतात तिथे घेऊन जायला लागलो. सगळी पालकं आपापल्या 'किड्'क्यांना सकाळी स्पर्धेसाठी घेऊन येत. प्रत्येक खेळात आधीचं टायमिंग ब्रेक केलं की गुण मिळतो... जास्त गुणाना पारितोषिक...!!

टिपीकल भारतीय पालकांची मानसिकता म्हणजे भरपूर points मिळवायला पुश करायचं... ते पण भारतीय पद्धतीप्रमाणे... 'जोरात पळ नाहीतर घरी गेलो की मार खावा लागेल'... 'उंच उडी मार नाहीतर आज जेवायला मिळणार नाही'... 'आज दोन points मिळवलेस तर चिप्स घेऊन देईन...!!' हे संवाद अगदी भरावर आले असतात.
आपली कार्टी पण काय सांगू तुम्हाला... एवढी सुस्त... पण धमक्या दिल्या की करून दाखवतात.

आमचा हा कार्यक्रम पद्धतशीर चालू असताना माझ्या शेजारचा गोरा मला विचारतोय... 'तू नक्की काय टीप्स देतोयस तुझ्या मुलीला... she is really performing her best ... hats off...!!!'
म्हणलं आमच्या मागच्या सगळ्या पिढ्या स्पोर्ट्समध्येच होत्या... वडिलोपार्जित चालत आलेल्या सिक्रेट टिप्स आहेत त्याच तिला सांगतोय...!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...