ऋचासाठी आम्ही एका दुकानातून क्राफ्ट क्ले आणली. त्यातली टुल्स घेऊन डायरेक्ट गणपतीची मुर्ती, फळांचे आकार, घरातले फर्निचर पासून अगदी बैलगाडीसुद्धा तयार केली.
काही दिवसांनी आमच्या शेजारचा मुलगा खेळायला घरी आला. आल्यादिवशी त्याने त्या किटच्या बॉक्सच्या तळाशी असलेले युजर गाईड काढले... जे आम्हीं पाहिलेसुद्धा नव्हते. त्यात ती टुल्स कशासाठी आणि कशी वापरायची हे शिकवलं होतं.
त्यातले दोन प्रकार करून बघितले. चित्रात दाखवल्यासारखे जमत नाहीत हे असमाधान... पाहिजे ते करू शकत होतो ते आता करायचे नाही हा अलिखित नियम... च्यायला सगळा मोकळेपणाच हरवला. उरलेला 'क्ले'चा गोळा आणि 'कलेचा' झरा त्या किटपुरता सुकत चालला आहे.
Think out of the box म्हणजे अगदी खोकडं उघडुन बघायचं सुद्धा नाही... कळ्ळलं...!!?
प्रणव.

No comments:
Post a Comment