च्यामारी टॊपी... माज्या आदी फारेनला गेलेल्या कोनीबी मला ह्याची कल्पना दिली नवती की हितं आल्यावर येवडी कामं करावी लागत्यात म्हनुन... घरात धुनं, भांडी, केर-फरशी, कापडं इस्त्री तर झालंच... पन गाड्या धुवा.. बागकाम करा... आनी काही तुटलं फुट्लं तर ते बी स्वत:च दुरुस्त करा...! आपन येकवेळ भाजी आनतुया... पन हितं दुध बी आनावं लागतयं...! आमच्या गावाला आमच्याकडं चार-चार नोकर लोकं... येक काम स्वोता करावं लागत न्हाई... आनी हितं गेल्या दीड-दोन वर्षात जेवडी भांडी घासली असतील तेवडी आमच्या मागच्या सात पिड्यात कुठल्या पुरुषानं घासली नसत्याल...!!
भायेर येगळीच तर्हा... दुकानात ट्राली घेऊन फिरायाची सवय आता आपल्याला झाली ह्याये पन हितं काऊंटरावर पन कोनी नसतंया... शेल्फ बिलींग म्हने... म्हनजे सामान मशिनीसमोर धरुन आपनच टुंक-टूंक करायचं आनी पैसे मशिनीत टाकायचे... देवळासमोरच्या भिकार्याच्या ताटलीत पडल्यावर आवाज होतो तसा आवाज करत बाकी चिल्लर आपल्या पुढ्यात येऊन पडते... पेट्रोल पंपावर दिकून कुनीच न्हाई... आपन स्वोता पेट्रोल भरुन घेयाचं...!! मला हे ठावच नव्हतं... फर्श्ट टाईम मी आपली गाडी पंपासमोर लावली आनी पेट्रोल भरन्यार्या पोर्याची वाट बघत गाडीतच बसून राह्यलो... नंतर ट्यूबलाईट पेटली की आपनच भरायचंय म्हनुन...!! घर बदली करायचं तर इचारुच नका. टेम्पो भाड्यानं आनायचा... आपनच सामान-सुमान भरायचं... टेम्पो आपनच चालवायचा... आन सामान हालवून झालं की पुन्यांदा पेट्रोल भरुन परत देऊन यायाचा...!! तसं हि सगळी कामं करायला लोकं भेटत्यात... पन लै महाग राव... एतके पैसं जात्यात कि नकूच वाटतया...!!
शेल्फ-सर्विसचा कहर झाला जवा माझ्या मित्रानं स्वोताचंच केसं कापायचं मिशीन मला गिफ्ट दिलं... म्हने ’क्लिपर ग्रुमिंग किट’ का काय... आता आरश्यात बगुन स्वोताची हेयर ष्टाईल स्वोताच करायची तेवडंच बाकी राह्यलं व्हतं राव...!!
गांधीजी खरं तर आपलं राष्ट्रपिता... पन त्येंचा स्वावलंबनाचा कित्ता ह्येच लोकं लै गिरवत्यात. जश्ये काय बापुंचे खरेखुरे अणूयायी हेच जनू...!!
प्रनो.

No comments:
Post a Comment