Saturday, January 24, 2015

मै बनुंगा करोडपती... ह्या:य...!!

नवीन वर्ष सुरु होऊन चांगला आठवडा होऊन गेला... कोका-कोलाचे बंपर प्राईज नाही, ग्रेट ब्रिटन पाऊण्डमध्ये लॉटरी नाही... मोबाईल नंबरची लकी निवड नाही... काळजी वाटायला लागली होती हो. हातखर्च चालायचा कसा हा विचार करतच होतो की आज ई-मेल आली.

गडाफीचा लिबीयामधला सेक्रेटरी आहे. मालकाला अमेरिकेने मारल्यापासून हा स्वत:चा जीव वाचवत फिरत आहे. त्याची काही मिलीयन डॉलर्सची संपत्ती सुखरूप बाहेर काढायला कुणाचीतरी मदत पाहिजे म्हणे. आता ह्या TOP सिक्रेट कामासाठी त्याने माझीच निवड केली आणि त्यासाठी मला काही मिलीयन डॉलर्स देऊ केले तर त्यात काय गैर आहे?

मी असले नायजेरीयन, ब्रिटनचे jackpots आणि झिम्बाब्वेच्या भूमिगत माजी पेट्रोलियम मंत्र्याकडून इतके अब्ज जिंकले आहेत की थोड्या दिवसात बिल गेट्सला ड्रायव्हर म्हणून ठेऊ शकेन.

प्रॉब्लेम येवढाच आहे की हे पैसे माझ्या खात्यात जमा करायला ते मला आठशे रुपये मागतायत. ते एकदा जमले की बघाच...!!

प्रणव.

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...