काल रात्री घरी येताना समोरच्या कारच्या मागल्या बाजूला छत्रपती शिवरायांचं युद्धसज्ज पोजमध्ये तलवार घेऊन उभे असलेलं स्टिकर.
मी लगेच बायकोला.. 'ते बघ समोर.. कुणी सांगायची गरजच नाही की समोरच्या कारमध्ये महाराष्ट्रातला मराठी मावळा आहे. त्याला मराठीच नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान आहे. बाहेरच्या देशात असून, येवढ्या महागड्या कारवर हे स्टिकर लावायला तो अजिबात कचरला नाही. छत्रपती हे आपलं आयडेंटिफिकेशन आहे..!!'
बायको आपली 'झालं ह्याचं सुरु' अश्या एक्सप्रेशनने व्हाट्सअँप बघत होती.
काही कळायच्या आत 'मस्ट टर्न राईट' लेनमध्ये उभ्या असलेल्या मावळ्याने लेफ्ट इंडिकेटर दिला आणि झपकन लेफ्ट लेनमध्ये झडप घातली. 'अ ते ज्ञ अश्या कुठल्याही अक्षराने लिहिता न येणार ब्रेकचा आवाज झाला'... मागच्या एक दोन गोर्यांनी 'फकारार्थी' दिलेल्या उपमा ऐकायला मावळा जागेवर नव्हता. गरुड केव्हाच उडाला होता.
आता इतक्या वेळ व्हाट्सअँपवर बिझी असलेली बायको माझ्याकडे बघत होती आणि मी 'सैन्य मागच्या मागे पळून गेल्यावर शत्रूच्या गोटात एकटाच उरलेल्या निशाण बहाद्दरासारखा' उसनं अवसान गोळा करीत छाती काढून गर्जलो...
'बघतेस काय रागाणं... सिग्नल तोडलाय वाघाणं...!!'
टीप: ही सत्य घटना असून ह्यात एका अक्षराची अतिशयोक्ती नाही.
फुकटची टीप: छत्रपतींचं स्टिकर लावणं गैर नाही... ते लावून माती खाणं... तेही बाहेरच्या देशात... 'डावा हात कलम करून गैरसोय करण्यास' पात्र गुन्हा.
प्रणव

No comments:
Post a Comment