Sunday, June 25, 2017

पण श्रद्धा कपूर...!?


आज एक नवीनच माहिती कळली. ऑस्ट्रेलियात तुम्ही मित्राचा खून केला ना तर तुम्हाला १५ वर्षांची शिक्षा होते बरं का. अर्थात माझं कारण ऐकून जज दहा वर्षे अशीच कमी करतील ह्याची मला खात्री आहे.

झालं असं.. ब्ल्यू रे थ्रीडी होम थिएटर घेतल्यापासून निवांत ऐकायला वेळ झाला नव्हता. आज सुट्टीचा पहिला दिवस. बाहेर सूर्यनारायण ४०℃ नी भूमातेवर भडास काढतोय. जाणार कुठे? म्हणून मित्राला बोलावून घेतलं.
हा सोंड्या येणार म्हणून बियर थंड करून ठेवली. स्नॅक्सपासून पिझ्झापर्यंत सगळा जामानिमा केला. 

निवांत बसून एक दोन सोमरसपात्रं पोटात उपडी झाली असतील नसतील.. आत्ता कुठे मैफिलीला रंग चढायला लागला होता. माझं १०० जीबी क्लासिकल कलेक्शन काढत महाराजांना फर्माईश विचारली. राजे स्क्रीनकडे नजर कशीबशी स्थिरावत म्हणाले..'श्रद्धा कपूर - भीमसेन' लिहिलंय ना ते लाव. बघू जरा काय आहे ते...!!'

नाही मान्य आहे दोन बियर उडाल्या होत्या... पण श्रद्धा कपूर...!?

पोलीस मार्गावर आहेत. वकिलाला फोन केलाय. तो पण हेच म्हणाला. कारण आपल्या बाजूने आहे. अजिबात काळजी करू नकोस. सहज सुटून जाशील. ही सुट्टी जरा बिझी जाईल असं दिसतंय..!!

प्रणव

No comments:

Post a Comment

माझ्या ब्लॉगची जन्मकथा

नारळ फुटी

बर्याच दिवसांपासुन काहीतरी लिखाण करावं असं मनापासुन वाटत होतं. कधी विषय सुचायचे पण शब्दांत उतरवायला वेळ नसायचा. कधी वेळ मिळालाच तर काय लिहाव...