काही क्षणच झालेत तुला ह्या जगात येऊन
अजुन कुठे पाहिलं आहेस तु डोळे उघडून
जाणवतेय तुझ्या पापण्यांची थरथर...
छकुले तु माझा हात धर...
तुझं बोबडं-बोबडं बोलणं
तुझं ते दुडू-दुडू चालणं
हसता गाली खळी ही हजर...
छकुले तु माझा हात धर...!
तुला दुध-भात मी भरवतो
तुझ्या खेळात मी हरवतो
मी न दिसता, तुझी भिर-भिर ही नजर...
छकुले तु माझा हात धर...!
तुला मोठं होताना बघतोय
एक एक क्षण डोळ्यांत साठवतोय
वर्षामागे वर्ष सरे झर-झर...
छकुले तु माझा हात धर...!
चिमणे, एक दिवस मोठी होशील
उंच आकाशात भरारी घेशील
तुझा बाबा तुझी वाट पाहिल
तुझ्या आठवणीने व्याकुळ होईल...
नुसत्या कल्पनेने काळजांत होई चर्र
छकुले तु माझा हात धर...!
छकुले तु माझा हात धर...!
प्रणव.
👌👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDelete