दरवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये 'मेलबर्न कप' म्हणून घोड्याची रेस असते. संपूर्ण ऑस्ट्रेलिया ह्या दहा-पंधरा मिनिटांच्या खेळासाठी वेडी असते. Nation stops when race starts असं सार्थ वर्णन ह्या दिवसाचं केलं जातं. ऑफिसेस पासून कॅसिनोजपर्यंत सगळीकडे मिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये ह्यावरून बेटिंग होतं. आमच्या ऑफिसात बॉस स्वतः उत्साह घेऊन बेटिंग चार्ट तयार करतो. दोन डॉलर्स ते पन्नास डॉलर्स आपल्या आवडत्या घोड्यावर लावायचे. (मी दरवर्षी पाच-सात डॉलर्स हारतो.) ऑफिसकडून ह्या दिवशी सगळ्यांना पिझ्झा आणि दुपारी शार्प बारा वाजता सगळे बोर्ड रूममध्ये टीव्ही समोर.
एकेका घोड्याची माहिती, जॅकीचे प्रोफाइल, एक्सपर्ट्सचे अंदाज वगैरे वगैरे भरपूर चर्चा असते. ही रेस मेलबर्नमध्ये होते. भरमसाठ पैसे खर्च करू शकणारे इतर शहरातून मेलबर्नला जातात. कित्येक मिलियन डॉलर्सचा दहा मिनिटांत चुराडा करायला.. रेसवर...!! करेना का. त्यांच्या बापाचा पैसे आहे तो.. उडवू देत...!!
खरी मजा येते तो दुसऱ्या दिवशीचा पेपर वाचायला. Drunk रीटार्ड्स ऍट मेलबर्न कप हेडिंगखाली 'दुपारी बारा वाजता पिऊन तर्र झालेल्या आणि नंगा नाच घालणाऱ्या श्रीमंत गोऱ्या ऑस्ट्रेलियावासीयांचे फोटो' मोठ्या चवीने छापून येतात.
तात्पर्य: कमी लोकसंख्या आणि ढुंगणावर दांडगा हाणणारा कायदा नसेल तर ही गोरीसुद्धा तेच करतील जे सामान्यतः अविकसित देशातले लोक करतात असा ह्यांचाच दावा असतो.
टीप: ही पोस्ट वैयक्तिक मतभेद नसून... येड्xव्या लोकांना जात, धर्म, वंश, देश किंवा शिक्षण ह्याचं कसलंही बंधन आड येत नाही हे सांगण्यासाठी आहे. कुठल्याही एका स्टीरिओटाईपमध्ये न अडकता नीरक्षीरविवेक वापरावा ह्या उद्देशाने लिहिलेली.
तळटीप: फक्त सेन्सॉरड फोटो दिलेत. बाकी ह्यांचा नंगानाच गुगल करून बघा.. लै मज्जा असते.. गुगल सेफ्टी ऑफ करायला विसरू नका हां..!!
तळतळटीप: लगेच ऑस्ट्रेलियावाले सगळे बेवडे असतात असं समजू नका. माझ्यासारखे काही सज्जनही राहतात इथे..

No comments:
Post a Comment